‘दारू बदनाम करदी’ म्हणतेय ‘ही’प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री 

आपल्या जबरदस्त अभिनयाच्या बळावर टेलिव्हिजन क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारी सरगुन मेहता ‘फुलवा’, ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘बालिका वधु’ मधील आपल्या अभिनयामुळे घराघरात ओळखली जाते.

२९ वर्षीय सरगुन मेहता सध्या पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. गतवर्षी तिला ‘लाहौरिए’ या पंजाबी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. सरगुन ही हाडाची डान्सर असून ती पती रवी दुबे यांच्यासह अनेक डान्स शोमध्ये सहभागी झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरगुनच्या डान्सचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे ज्यामध्ये ती पंजाबी सॉंग ‘दारू बदनाम करदी’ वर थिरकताना दिसत आहे. हे गाणे पंजाबी सिंगर कमल कोहलन आणि परम सिंह यांनी गायले आहे. हा डान्स यश कदम याने कोरिओग्राफ केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)