एमपीएससीच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावार प्रसिध्द

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) या स्पर्धा परीक्षेच्या सहायक कक्ष अधिकारी पदासाठी स्वतंत्र पेपर (पेपर क्रमांक 2) या प्रश्‍नपत्रिकेच्या चारही संचाची प्रथम उत्तरतालिका (ऍन्सर कीज्‌) उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ही परीक्षा दि. 27 ऑक्‍टोबर 2018 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रश्नपत्रिकेच्या उत्तरतालिकेतील प्रश्‍नोत्तरासंबंधी हरकती नोंदवयाची असल्यास, त्यानी आयोगाकडे दि. 12 नोव्हेंबरपूर्वी करणे आवश्‍यक आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हरकतीचा नमुना उपलब्ध आहे. त्या नमुन्यात अर्ज करणे करणे आवश्‍यक आहे. अन्य कोणत्याही नमुन्यातील हरकती स्वीकारल्या जाणार नाही. वेळेत आलेल्या हरकतीचा विचार केले जाणार आहे. त्यानंतर आलेल्या हरकती विचारात घेतली जाणार नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)