धादांत खोटे रिलायन्स ग्रुप : कॉंग्रेस

नवी दिल्ली – उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने राफेल करारासंदर्भात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले नवे आरोप फेटाळून लावले आहेत. कॉंग्रेसने पुन्हा एकदा धादांत खोटे आरोप केले. काही राज्यांमधील विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कंपनीला आणि कंपनीचे प्रमुख अंबानी यांना राजकीय लढाईत सातत्याने ओढले जात आहे.

राजकीय लाभासाठी कॉंग्रेसने कंपनी आणि अंबानीं विरोधात अनावश्‍यक मोहीम राबवताना पुन्हा वस्तुस्थितीचा विपर्यास केला, असे रिलायन्स ग्रुपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. राफेल करारावरून विरोधक आणि विशेषत: राहुल सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच अनिल अंबानी यांना लक्ष्य करत आहेत. मात्र, विरोधकांचे आरोप रिलायन्सकडून प्रथमपासूनच फेटाळले जात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)