वोटर स्लीपवर मतदान वेळ चुकीची छापण्यात आल्याने उडणार गोंधळ

संग्रहित छायाचित्र

पुणे – लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून फोटो वोटर स्लीपचे वाटप करण्यात येत आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील या स्लीपवर मतदानाची वेळ चुकीची छापण्यात आली आहे. प्रत्यक्षात मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी असताना प्रशासनाने मात्र मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 अशी छापली आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात दोन टप्प्यात निवडणुका होणार आहे. पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दि.23 एप्रिल रोजी तर शिरूर व मावळ मतदारसंघासाठी दि.29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या चारही मतदारसंघात फोटो वोटर स्लीपचे वाटप सुरू आहे. शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात वाटण्यात आलेल्या स्लीपमध्ये ही चूक झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)