सौंदर्यप्रसाधनांसंबधी भुलवणारे खोटे दावे यापुढे बंद – नवीन मानके-नियम जारी

नवी दिल्ली: सौंदर्यप्रसाधनांची एक फार मोठी बाजारपेठ आहे. सुंदर, आकर्षक दिसण्यासाठी लोक अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरतात. त्यावर मोठा खर्च करतात. ही उत्पादने खरोखरच सुरक्षित आहेत, त्यापासून किती दिवसात व किती लाभ आहे याबाबत अनेक दावे केले जातात. प्रत्यक्षात मात्र ही उत्पादने किती सुरक्षित आहेत, याची काही खात्री नसते. यापुढे मात्र हे चालणार नाही. भारतीय मानक ब्युरोने आता त्यासाठी नवीन नियम, नवीन मानके जारी केली आहेत. आजवर सौंदर्यप्रसाधनांसाठी कोणतीही नियामक संस्था नव्हती आणि ती ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्‍सच्या अखत्यारीतही येत नव्हती.

नवीन नियमांनुसार नवीन सौंदर्यप्रसाधन बाजारात आणण्यापूर्वी त्याची मंजुरी घ्यावी लागणार आहे, आणि त्यासाठी त्या उत्पादनाची सर्व माहिती द्यावी लागणार आहे. ग्राहकाच्या हातात पोहचेपर्यंत उत्पादनाच्या गुणवत्तेत काही कमतरता येऊ नये म्हणून पॅकेजिंगबाबतही खास काळजी घ्यावी लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या उत्पादनाच्या चाचणीसठी काही प्राण्यांचा वापर करण्यात येऊ नये याची खात्री बाळगण्यात येणार आहे. सौंदर्य प्रसाधनांच्या चाचणीसाठी प्राण्यांना त्रास होऊ नये, म्हणून ही काऴजी घेण्यात येत आहे. हे नियम भारतीय उत्पादनांबरोबरच परदेशी उत्पादनांनाही लागू होणार आहेत.

उदा. 15 दिवसात गोरेपणाची हमी देणाऱ्या काही क्रीम्स बाजारात आहेत, पण दोन दोन वर्षे वापरली, तरी त्यांचा प्रभाव झालेला दिसत नाही. असे खोटे दावे करणाऱ्या उत्पादनांवर लोक भरपूर पैसे खर्च करतात. त्यांच्यावर काही कारवाईही करता येत नाही. नवीन नियमांमध्ये अशा उत्पादनांवर कारवाई करण्याची तरतूद आहे.
या नियमांबाबत आणि मानकांबाबत गृह मंत्रालयाने सामान्यजनांची मते मागवली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)