यापुढे फैजाबादचे नाव अयोध्या 

अयोध्या, (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण आता अयोध्या असे करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज ही घोषणा केली. “अयोध्या ही “आत्मसन्मान, गौरव आणि प्रतिष्ठे’चे प्रतिक आहे. अयोध्या शहर हे भगवान रामाच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे अयोध्येबाबत कोणीहे अन्याय करू शकणार नाही.’असे आदित्यनाथ यांनी आज सांगितले. दीपावली निमित्त राज्य सरकारने आयोजित केलेल्या दीपोत्सवाप्रसंगी बोलत होते.

अयोध्येमध्ये महाराज दशरथ राजा यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय आणि अयोध्येमध्ये भगवान रामाच्या नावाने विमानतळ उभारण्याची घोषणाही आदित्यनाथ यांनी केली. उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाला कोरिया प्रजासत्ताकच्या फस्ट लेडी किम जंग सुक या प्रमुख पाहुण्या होत्या. अयोध्या येथे राणी सुरीरत्न (हिओ व्हॉंग-ओक) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमातही सहभागी झाल्या. अयोध्या आणि कोरिया यांचे ऐतिहासिक, सखोल संबंध आहेत. अयोध्येच्या राणी सुरीरत्न यांनी कोरियाला ख्रिस्त इरा 48 मध्ये भेट देऊन कुरियन राजा सुरो यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)