Video: विश्वास नांगरे पाटील यांची बदली; सुहास वारके यांनी स्वीकारला पदभार

कोल्हापूर: कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून सुहास वारके यांनी आज पदभार स्वीकारला आहे. विश्‍वास नांगरे-पाटील यांची नाशिक पोलिस आयुक्‍तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी सुहास वारके हे आज पासून कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक पदी रुजू झाले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रात कडक शासन आणि गुन्हेगारांवर वचक ही माझी प्रायोरिटी असल्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी सांगितलं आहे.

राज्यातील अप्पर पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक दर्जाच्या पोलिसअधिकार्‍यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात विश्वास नांगरे-पाटील आणि सुहास वारके यांचा समावेश आहे. नवे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके मूळचे जळगावचे आहेत. ते २००० मध्ये ते भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले. १९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी सोलापूरचे पोलिस उपायुक्‍त, बीडचे पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध, राज्य गुन्हे अन्वेषण, राष्ट्रीय तपास यंत्रणेमध्ये (एनआयए) अशी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. सध्या ते दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून मुंबईत कार्यरत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिस दलात दाखल झाल्यानंतर 2002 ते कोल्हापूरला प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक म्हणून अल्पकाळ कार्यरत होते. कडक शिस्त, प्रशासनावर पकड, समाजकंटकांवर वचक ठेवण्यात त्यांचा हातखंडा, असा त्यांचा लौकिक आहे. पोलिस कल्याण कार्यक्रमांतर्गत पोलिस आणि कुटुंबीयांच्या हिताच्या विविध योजना राबविण्यात नेहमीच त्यांची सकारात्मक भूमिका राहिली आहे. नांगरे-पाटील यांनी 12 जुलै 2016 रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पदभार कार्यभार स्वीकारला होता. दोन वर्षांच्या कामगिरीनंतर पोलिस महासंचालकांनी त्यांना मुदतवाढ दिली होती. कोल्हापूर, सांगलीसह परिक्षेत्रातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी त्यांनी महत्त्वाची पावले उचलली होती.

आज दुपारी 12 च्या सुमारास विश्वास नांगरे पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राची महानिरीक्षक पदाची सर्व सूत्रे सुहास वारके यांच्या कडे सुपूर्द केली आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांनीही एकमेकांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी बोलताना सुहास वारके यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह ५ जिल्ह्यात विश्वास नांगरे पाटील यांनी जे पायंडे पाडले आहेत ते पुढेही सुरू ठेवले जातील तसच परिक्षेत्रात कडक शासन आणि गुन्हेगारांवर वचक ही माझी प्रयोरिटी असल्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी सांगितलं आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/383149852464851/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)