#चर्चेतील चेहरे: जाणून घेऊया ‘ईमर्सन म्नानगाग्वा’ यांच्याविषयी 

झिम्बाब्वेमध्ये दीर्घकाल अध्यक्ष राहिलेल्या रॉबर्ट मुगाबे यांच्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणूकीमध्ये ईमर्सन म्नानगाग्वा हे देशाचे अध्यक्ष निवडले गेले आहेत. मुगाबे यांच्यानंतर लगेचच म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी येऊन पडली होती. यावर्षीच्या निवडणूकांमधून त्यावर शिक्कामोर्तब झाले. मुगाबे यांचे उत्तराधिकारी होण्याची म्नानगाग्वा यांची दीर्घकाळापासूनची महत्वाकांक्षा होती, ती अखेर पूर्ण झाली.

लष्करी उठाव आणि व्यापक जनआंदोलनाचा परिणाम म्हणून मुगाबे यांनी अध्यक्षपदाचा राजीनमाअ दिला आणि तेंव्हाच म्नानगाग्वा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड झाली. राजकीय वर्तुळामध्ये म्नानगाग्वा यांना “क्रॉकोडाईल’म्हणून ओळखले जाते. अर्थात सत्ता संपादन करण्यासाठी त्यांनी केलेल्या उद्योगांमुळे झिम्बाब्वेला जागतिक पटलावर “चेहरा’ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीला झिम्बाब्वेमध्ये आकर्षित करून देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे मुख्य काम म्नानगाग्वा यांनी निश्‍चित केले आहे. झिम्बाब्वेत मुगाबे यांच्या आतापर्यंतच्या दडपशाहीच्या राजवटीदरम्यान जेवढी कारस्थाने, कारवाया आणि दडपशाहीचे उद्योग झाले, त्या सगळ्याला उपाध्यक्ष या नात्याने म्नानागाग्वा हे साक्षीदार होते.

झिम्बाब्वेला 1980 साली स्वातंत्र्य मिळाले तेंव्हापासून त्यांच्या झानू पी.एफ. या पक्षाचीच अनिर्बंध सत्ता देशावर राज्य करत राहिली होती. एका अर्थी आतापर्यंतच्या दडपशाहीचे पडद्यामागचे शिल्पकार म्नानगाग्वा हेच होते. त्यांच्या समवेत स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे त्यांचे सहकारी म्नानगाग्वा यांना “क्रूर, दुष्ट, कपटी’ असेच संबोधतात. कोणतेही भाव भावना नसलेल्या या व्यक्‍तीला त्याची मुले मात्र त्यांच्या व्यवहारिकपणालाच तत्वनिष्ठ मानतात. मात्र हीच बाजू त्यांच्या व्यक्तिमत्वातील जादू क्षीण करते आणि त्यांची भाषणे प्रभावी होत नाहीत, असे राजकीय निरीक्षक मानतात.

राजकारणामध्ये आपल्या चातुर्याने त्यांनी विरोधकांना निष्प्रभ केले आहे. म्हणूनच मगर ही उपाधी त्यांच्यासाठी सार्थ आहे. उमेदीच्या काळात त्यांनी चीन आणि इजिप्तमध्ये लष्करी प्रशिक्षण घेतले आहे. स्वातत्र्य चळवळीदरम्यान रॉक्‍सियन फौजांवर त्यांनी हल्ले केले. त्यादरम्यान पकडले जाऊन त्यांना छळही सोसावा लागला. 1960 ते 1970 दरम्यान झिम्बाब्वेच्या स्वातंत्र्यासाठीच्या युद्धात त्यांनी थेट सहभागही घेतला.

1980 च्या दशकात यादवी युद्धाच्या काळात त्यांनी निष्ठूरतेने बंड मोडले. त्यात हजारो लोक मारले गेले. मात्र या हत्याकांडात आपला हात असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला. 2008 च्या निवडणूकीत त्यांनी विरोधकांना अक्षरशः संपवले. मात्र असे असले तरी देशवासियांना दोनवेळी चांगले जेवण मिळायला हवे. यासाठी देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत असली पाहिजे, याकडे म्नानगाग्वा यांचा कटाक्ष आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)