फेसबुकचे लिप सिंक लाइव्ह फिचर लवकरच लॉन्च

मुंबई – फेसबुक लवकरच आपल्या वापरकर्त्यांना एक आगळ वेगळे फिचर देणार आहे. यापूर्वी फेसबुकने छोटी ऑडिओ क्‍लिप रेकॉर्ड करण्याची सुविधा फेसबुक वापरकर्त्यांना दिली होती. तसेच आता वापरकर्त्यांना एक आगळ वेगळे लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. फेसबुक स्टोरीमध्ये आता म्युझिकचाही पर्याय उपलब्ध होणार आहे. या द्वारे वापरकर्त्यांना लवकरच आपल्या प्रोफाइलमध्ये आवडींच्या गाण्यांच्या समावेशही करता येणार आहे. याबरोबरोच फेसबुकने लीप सिंग लाइव्ह फिचरही अपडेट केले.

प्रोफाइलमध्ये आवडींच्या गाण्यांच्या समावेश

या फिचरचा वापर करून युजर्सला प्रोफाइलच्या म्युझिक सेक्शनमध्ये आवडत्या गाण्यांच्या समावेश करता येणार आहे. तसेच गाणे तुमच्या प्रोफाइलमध्ये सर्वात पहिले दिसावे यासाठी ‘पिन मार्क’चाही पर्याय असणार आहे. त्याचबरोबर फेसबुक स्टोरीमध्ये फोटो निवडताना त्यासोबत म्युझिक सर्च ऑप्शनमध्ये आवडीचे गाने सर्च करता येईल.

 

लिप सिंक लाइव्ह फिचर

म्यूजिकली अॅपप्रमाणे हा फिचर तयार करण्यात आला आहे. या फिचरच्या माध्यमातून लिप्सिंग सेल्फी व्हिडिओ तयार करता येणार आहेत. हे व्हिडिओ फेसबुकवर थेट पोस्टही करता येतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)