भारतातील निवडणुकांसाठी फेसबुकची टास्क फोर्स 

द्वेषमूलक प्रचार रोखण्यासाठी पाऊल 
नवी दिल्ली: सोशल नेटवर्किंगमधील आघाडीची कंपनी असणाऱ्या फेसबुकने भारतातील निवडणुकांसाठी टास्क फोर्स स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेषमूलक प्रचार रोखण्यासाठी ते पाऊल उचलले जाणार आहे. काही देशांमधील निवडणुकांवेळी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फेसबुकवर झाला.
त्यापार्श्‍वभूमीवर, भारतातील निवडणुकांसाठी फेसबुककडून सावधानता बाळगली जात आहे. आमचा प्लॅटफॉर्म मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुकांसाठी पूरक ठरावा. तो जनता आणि राजकीय नेत्यांमधील संपर्कासाठी प्रोत्साहनदायी ठरावा. मात्र, त्याचा गैरवापर होऊ नये, अशी आमची इच्छा असल्याचे फेसबुककडून स्पष्ट करण्यात आले. आरोपांचे लक्ष्य ठरल्यानंतर फेसबुकने याआधीच द्वेषमूलक प्रचार आणि हिंसाचार फैलावण्यास कारणीभूत ठरणारा मजकूर हटवण्याचे धोरण अंमलात आणण्यास सुरूवात केली.
आता जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील आगामी निवडणुका ध्यानात घेऊन फेसबुकने टास्क फोर्स नेमण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये सुमारे 20 हजार सदस्यांचा समावेश असेल. भारतातील निवडणुकांवेळी राजकीय जाहिरातींसंदर्भात अधिक पारदर्शकता यावी यासाठीही फेसबुक प्रयत्नशील आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)