फेसबुक म्हणजे डिजीटल गॅंगस्टर – ब्रिटिश खासदारांची फेसबुकवर टीका

लंडन (ब्रिटन) – फेसबुक म्हणजे डिजीटल गॅंगस्टर अशा शब्दात ब्रिटिश खासदारांनी फेसबुकवर टीका केली आहे. ब्रिटिश खासदारांनी सोमवारी जारी केलेल्या एका अहवालात फेसबुकवर ब्रिटनमध्ये जाणीवपूर्वक माहितीच्या खासगीपणासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि प्रतिस्पर्धा विरोधी कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. फेसबुकला डिजीटल गॅंगस्टर असे संबोधून सोशल मीडिया कंपन्यांवर अधिक कठोर नियंत्रण ठेवले पाहिजे असे आवाहन केले आहे. सुमारे 18 महिन्यांच्या अभ्यासानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

सोशल मीडिया वेबसाईट्‌नी आचार संहितेचे अनिवार्यपणे पालन केले पाहिजे, आणि हानिकारक व अवैध सामग्रीवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र नियामक मंडळ असले पाहिजे असे अहवाल तयार करणाऱ्या संसदीय समितीने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विशिष्ट निर्णयासाठी माहिती आणि जबाबदारी दडवून ठेवता यावी अशा प्रकारे फेसबुक साईटची संरचना करण्यात आलेली आहे, असें फेसबुकबाबत निरीक्षण करण्यात आले आहे, आणि जाणीवपूर्वक माहितीचा खासगीपणा आणि स्पर्धात्मक कायद्याचे उल्लंघन केले असल्याची नोंद करण्यात आलेली आहे.

सदर संसदीय समितीने फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क जुकरबर्ग यांच्यावर ब्रिटिश संसदेचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. अनेक वेळा संसदेसमोर हजर राहण्यास सांगण्यात येऊनही ते हजर झाले नाहीत आणि त्यांना पाठवलेल्या ई-मेल्सचेही त्यांनी उत्तर दिले नाही.

आपल्या उपभोक्‍त्यांची माहिती कशी सांभाळली जाते याबाबत सोशल मीडिया कंपन्यांना चौकशीला सदैव सामोरे जावे लागत आहे, आंणि निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी अपयशी होत असल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)