फेसबुकवरील २९ मिलियन युजर्सचा डेटा लीक, फेसबुकची कबुली

सॅन फ्रान्सिस्को: फेसबुक द्वारे गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या ‘डेटा चोरी’ प्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. फेसबुकच्या आकडेवारी नुसार तब्ब्ल २९ मिलियन लोकांचा डेटा हॅकर्सच्या हाती लागला असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत फेसबुकने ‘डेटा चोरी’चे प्रकरण उघड झाल्यानंतर तब्ब्ल ५० मिलियन लोकांची अकाउंट्स हॅक झाल्याचा अंदाज वर्तवला होता. हॅकर्सद्वारे या हल्ल्यामधून ‘ऍक्सेस टोकन्स’ची चोरी करण्यात आली होती. ‘ऍक्सेस टोकन्स’ मुळे हॅकर्सना एखाद्या व्यक्तीची गुप्त माहिती हाताळता येत होती.

डेटा हॅक झालेल्या अकाउंट्सच्या ताज्या आकडेवारी बाबत फेसबुक द्वारे समाधान व्यक्त करण्यात आले असून अपेक्षे पेक्षा कमी लोकांना याचा तडाखा बसला असल्याचे समजल्याने फेसबुकचे वरिष्ठ अधिकारी गाय रोसेन यांनी ऑनलाईन पोस्टद्वारे आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)