कोल्हापूरातील चावरे गावच्या तरुणाला चोपलं
कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चावरे गावच्या अक्षय तांबवेकर या किशोरवयीन तरुणास राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री चोप देत कोल्हापूरी खाक्या दाखवत चोप दिला आहे.
ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, या सुप्रिया सुळे यांच्या विधानाविषयीच्या बातमीची पोस्ट एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक अकाउंटवर होती. या बातमीच्या कॉमेंट बॉक्समध्ये या तरुणाने सुप्रिया सुळेंविषयी अपशब्द वापरले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलने या तरुणाचा शोध घेतला असता तो कोल्हापूर जिल्ह्यातील चावरे येथील असल्याचे निष्पन्न झाले.
याची माहिती मिळताच संतप्त कोल्हापूरातील राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाशी संपर्क साधला, त्याला बोलावणे पाठविले, पण तो आला नाही.त्यामुळे कार्यकर्त्यांनी चावरे गावी जाउन त्याचा शोध घेत त्याला चोप दिला आणि जाहीर माफी मागायला भाग पाडले, शिवाय या तरुणाचे हे कृत्य त्याच्या आईवडिलांच्या निदर्शनास आणून दिले. कार्यकर्त्यांनी या तरुणाला त्याच्या आईवडिलांच्या पाया पडायला सांगितले.