जगभरात एकाचवेळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद

मुंबई  – भारतासह अमेरिका, युरोप आणि जगातील अनेक ठिकाणी फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडले होते. त्यामुळे लाखो नेटिझन्सना “ऑनलाईन’ येण्यासाठी आणि अपडेट देण्यासाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला.
याशिवाय इन्स्टाग्रामवरही फोटो अपलोड करताना त्रास सहन करावा लागला. यामुळे ट्विटरवर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

गुरुवारी सकाळपासून फेसबुक “डाऊन’ असल्याचे बोलले जात होते. युरोप आणि आशिया खंडामध्ये ही समस्या अधिक असल्याचे समजले. मात्र अमेरिका आणि अन्य भागात फेसबुकवर अपडेट सुरुच होते. फेसबुकच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये इतकावेळ सेवा खंडीत होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. फेसबुक ठप्प झाल्याने युजर्स हैराण झाले होते. याबद्दलची नाराजी अनेकांनी ट्विटरवर व्यक्त केली. फेसबुक युुजर्सनी नोटिफिकेशनचे स्क्रीनशॉट्‌स शेअर केले आहेत. सध्या फेसबुक डाऊन आहे. काही मिनिटांमध्ये सेवा पूर्ववत होईल, असं नोटिफिकेशन फेसबुकवर लॉग इन करताच दिसू लागले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)