डोळ्यांचा नवा आजार अम्ब्लोपिया…

ज्यांचे मूल सतत मोबाईल, टॅब, गेम, व्हीडिओ गेम खेळतात अशा लहान मुलांना एक नवीन आजार सुरू झालाय त्याचे नाव आहे, अम्ब्लोपिया (म्हणजेच एक डोळा आळशी होणे). रडणाऱ्या मुलांना व्हिडिओ तसेच मोबाईल गेम किंवा अतिवेळ टीव्ही पाहू दिला जातो. त्याचे रडणे थांबते व तुमचे कौतुक पूर्ण होते, पण मुलाचे नुकसान होते. सातत्याने प्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे डोळ्यातील बाहुली लहान होते.

त्यानंतर प्रकाश सहन न होऊन एका डोळ्याची क्षमता कमी होऊ लागते. अशा वेळी डोळ्यातून नैसर्गिकरीत्या येणारे ओनी बंद होऊन कृत्रिमरीत्या पाणी येऊ लागते. अशावेळी डोळ्याच्या कडा लाल होऊ लागतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डोळ्यांची नजर कमी होऊ लागते. अशा मुलांना अम्ब्लोपिया (म्हणजेच एक डोळा आळशी होणे) हा आजार होतो. कारण, अतिरिक्त प्रकाश पडून एक डोळा आळशी होतो आणि तो डोळा 80 टक्के निकामी होतो व नंतर कधीही दुरुस्त होत नाही. म्हणून जागे व्हा, मुलांना यापासून दूर ठेवा. शिवाय या मुलांमध्ये हार्मोनल इम्बालन्स तयार होतो.

डोळ्यांच्या रंगांविषयी… 
डोळ्यांचे रंग विशेषत: लुभावणारे ठरतात. यामध्ये नीळे डोळे खासकरून. आपल्याही डोळ्यांचा रंग काळा असण्यापेक्षा नीळा असता तर, ती कल्पना मनात डोकावतेच. यासाठी मग काही पर्याय वापरले जातात. विशेषत: लेन्सद्वारे डोळ्यांचे रंग बदलले जाऊ शकतात आणि आपल्याला हव्या असणाऱ्या डोळ्यांचा रंग आपल्याला मिळू शकतो.

डोळ्यांचा तपकीरी रंग, करडा रंग, हिरवा त्याचबरोबर नीळा रंगही व्यक्‍तिमत्त्व खुलविणारा ठरतो. जन्मजात नीळ्या रंगाचे डोळे असणारी मुलं पाहिली की, डोळे आकर्षक भासतात. मात्र, जन्मजात डोळे नीळ्या रंगाचे नसले, तरी अलीकडे कॉन्टॅक्‍ट लेन्सच्या वापराने डोळ्यांचा रंग बदलून व्यक्तिमत्त्व खुलविले जाते. कॉन्टॅक्‍ट लेन्सची अलीकडे फॅशन आहे. मात्र, लेन्स वापरताना आवश्‍यक ती काळजी घेणेही महत्त्वाचे ठरते. लेन्सच्या वापरामुळे कधी कधी डोळ्यांना खाज येणे, जळजळ होणे आदी त्रास जाणवू शकतो.

लेन्सचा वापर करण्यापूर्वी हात स्वच्छ असणे आवश्‍यक आहेत. लेन्स शक्‍यतो मेकअप करण्यापूर्वी लावावेत. अन्यथा पावडरचे कण राहिल्याने त्याचाही त्रास जाणवू शकतो. नजर कमी येणे, नेत्र दोष तसेच खास करून चष्मा नको असेल तर लेन्सचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, नीळे, भुरे, करडे, हिरवे आदी डोळ्यांचे रंग अनुभवण्यासाठी कॉन्टॅक्‍ट लेन्स व्यक्‍तिमत्त्व खुलविण्यास मदत करते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)