शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य तसेच विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागामार्फत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तींसाठी महाडिबीटी हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहे. हे संकेतस्थळ माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या संकेतस्थळावरच विद्यार्थ्यांना सर्व अर्ज भरावे लागणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समाजकल्याण विभागामार्फत सर्व समाज घटकांना शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व विद्यावेतन, निर्वाह भत्ता वितरित करावयाच्या योजनांचा समावेश याच संकेतस्थळावर करण्यात आलेला आहे. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपणास लागू असणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावर त्वरित अर्ज भरावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा कोणताही विचार केला जाणार नाही, असे पुणे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)