मनपा क्षेत्रात मूलभूतच्या कामांना मुदतवाढ

खा.दिलीप गांधी यांनी नगरविकास प्रधान सचिवांकडे केली होती मागणी
नगर- शासनाकडून महानगरपालिकेस मनपा क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत रुपये तीन कोटी मंजूर केले होते .या निधीच्या कामांचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीपुढे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता व त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती. त्यानुसार या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या हि कामे पूर्ण करण्याचा कालावधी जून अखेर होता.

या योजनेच्या कामांसाठी प्रथम ई-निविदा प्रसिद्ध केल्यानंतर निविदाधारकांकडून पुरेशा प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने विकास कामांना मुदतवाढ दिल्याने मोठा कालापव्यय झालेला आहे तसेच निविदा स्वीकृतीनंतर ठेकेदारांकडून सुरक्षा रक्कम भरून घेणे, करारनामा करणे, कार्यारंभ आदेश देणे तदनंतर प्रत्यक्षात कामे पूर्ण करून ठेकेदारास देयके अदा करणे या सर्व बाबी लक्षात घेता हि कामे जून अखेर पर्यंत पूर्ण होणार नसल्याने या कामांना मुदतवाढ मिळणे आवश्‍यक होते.

-Ads-

महानगरपालिकेची मूलभूत सोयी सुविधा योजनेतील कामे काही तांत्रिक अडचणींमुळे जून मध्ये पूर्ण होत नसल्याने या कामांना डिसेंबर अखेर मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजपाचे मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, नगरसेवक महेश तवले, नगरसेविका मालनताई ढोणे, नगरसेविका मनीषाताई बारस्कर यांनी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे केली होती. यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची मंत्रालयात भेट घेतली व त्यांना कामांच्या मुदतवाढीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. काही प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे कामे अपूर्ण राहिल्याने निधी अखर्चित राहिला तर नागरिकांसाठीची मूलभूत योजनेची कामे पूर्ण होणार नाहीत हि बाब प्रधान सचिवांच्या लक्षात आणून दिली व सदरची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली.

खासदार दिलीप गांधी यांनी केलेल्या मागणीचा विचार करून प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना त्वरित अहमदनगर महानगरपालिकेच्या मूलभूतच्या कामांना डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यासंदर्भातच्या सूचना केल्या. त्यानुसार कक्ष अधिकारी धोंडे यांनी तसे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)