दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

सातारा – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता 16 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्च 2019 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षांसाठी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरुन ऑनलाईन नियमित शुल्कासह भरण्यासाठी 15 ऑक्‍टोंबर ते 5 नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली होती. मात्र माहिती भरताना काही शाळांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आता माध्यमिक शाळांना नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता 16 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

1 डिसेंबरपर्यंत शाळांनी बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे आहे. 5 डिसेंबरला शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा कराव्यात. विद्यार्थ्यांच्या याद्यांची प्रिंट काढण्यासाठी 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर अशी मुदत देण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फतच अर्ज भरावेत, असा सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी माध्यमिक शाळांना दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)