बेंगळूरुमधील प्रयोगशाळेत स्फोट; एका शास्त्रज्ञाचा मृत्यू

बेंगळूरु: “इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स’च्या प्रयोगशाळेमध्ये झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. “आयआयएस’च्या “एरोडायनामिक लॅबोरेटरी’मध्ये एका प्रयोगादरम्यान हा स्फोट झाला. या प्रयोगशाळेत सुरू असलेल्या प्रयोगासाठी एका खासगी कंपनीचे चार तंत्रज्ञ कार्यरत असताना दुपारी 2.20 वाजता हा स्फोट झाला.

या स्फोटात मूळ म्हैसूरचे तंत्रज्ञ मनोज हे जागीच ठार झाले. तर अन्य तिघेजण जखमी झाले. या तिघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. या सिलेंडरचा स्फोट होण्यामागील नेमके कारण आणि स्फोटाचे स्वरुप याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. गॅसने भरलेल्या या सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.

-Ads-

बेंगळूरुमधील स्टार्ट अप कंपनी सुपरवेव्ह टेक्‍नोलॉजीस प्रा.लि. ने “आयआयएस’शी भागीदारीमध्ये काही संशोधन करायला सुरुवात केली होती. त्या संशोधनाचे काम सुरु असतानाच हा स्फोट झाला. स्फोटाचे नेमके कारण फॉरेन्सिक तज्ञांच्या तपासणी अहवालानंतरच समजू शकेल, असे पोलिस उपायुक्‍त निरंजन राज उर्स यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)