पाकिस्तानमध्ये बनावट चकमक प्रकरण उघड

लाहोर: पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे दहशतवाद विरोधी पथक “सीटीडी’च्या प्रमुखांना आज प्रशासनाने बनावट चकमक प्रकरणावरून पदावरून कमी केले. गेल्या आठवड्यात झालेल्या चकमकीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. ही चकमक “सीटीडी’ने बनावटरितीने घडवून आणल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. या चकमकीच्यावेळी उपस्थित असलेल्या “सीटीडी’च्या अधिकाऱ्यांवर दहशतवाद आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या चकमकीच्या तपासासाठी संयुक्‍त तपास पथक नियुक्‍त करण्यात आले होते. या पथकाने केलेल्या तपासानंतर चकमकीमध्ये सहभागी झालेल्या “सीटीडी’चे पंजाब प्रांताचे प्रमुख अतिरिक्‍त महानिरीक्षक राय ताहिर यांच्यासह “सीटीडी’च्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे, अशी माहिती पाकिस्तानचे कायदा मंत्री बशरत राजा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लाहोरपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या साहिवाल भागामध्ये महामार्गावर “सीटीडी’ने बनावट चकमकीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांना ठार केले होते. त्यामध्ये एका 13 वर्षीय मुलीचाही समावेश होता. एका कारमध्ये एक दाम्पत्य, त्यांची 4 मुले आणि चालकावर “सीटीडी’च्या अधिकाऱ्यांनी गोळीबार केला होता. हे कुटुंब इसिसशी संबंधित असल्याचे “सीटीडी’ने म्हटले होते. मात्र नंतर ठार झालेले तिघेजण निरपराध असल्याचे जाहीर केले होते. या प्रकरणी अधिक तपास झाल्यावर आणखी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असेही राजा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)