आपल्या मुलांना समजवा, दहशतवादाकडे वळाल, तर गोळ्या घालू-लष्कराचे आवाहन

नवी दिल्ली – आपल्या मुलांना रोखा, ते दहशतवादाकडे वळतील-हाती बंदुका घेतील तर गोळ्या घालू. त्यांना रोखा. असे आवाहन भारतीय लष्कराने काश्‍मीरमधील मातांना केले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 100 तासांच्या आतच भारतीय लष्कराने कारवाई करून जैशचा काश्‍मीरमधील सर्वात मोठा, मोस्ट वॉंटेड कमांडर कामरान याला उडवले आहे. या संपूर्ण कारवाईची माहिती लष्कर, सीआरपीएफ आणि पोलीस यांनी मिळून मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्यांची मुले बहकलेली आहेत, पथ भ्रष्ट झाली आहेत, अशा मातांनी आपल्या मुलांना समजवावे, दहशतवादाच्या मार्गावरून मागे वळवावे, लष्करापुढे शरणागती घ्यायला सांगावी, असें परिषदेत बोलताना लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लॉं यांनी सांगितले. जर कोणा युवकाने बंदूक उचलली आणि दहशतवादाचा मार्ग धरला तर त्याची आता खैर नाही, त्याला सरळ मारले जाईल असे लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लों यानी स्पष्ट केले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आयएसआयचा हात असल्याचा संशय आहे, पण जैशचा कंमांडर मारला गेल्याने स्थिती नियंत्रणात आहे, असेही त्यांनी सांगितले. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी लष्कराचा बगलबच्चा आहे आणि त्याला आयएसआय नाचवते असे लष्कराच्या प्रवक्‍त्यांचे म्हणणे आहे.

शहिदांच्या कुटुंबीयांनी स्वत:ला एकाकी समजू नये, आम्ही त्यांच्या सोबत आहोत असा त्यांनी विश्‍वास दिला. काश्‍मीरी बालकांसाठी 14411 ही हेल्पलाईन जारी करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)