पुणे – उपग्रह प्रक्षेपणाचा रोमांच अनुभवा…

इस्त्रोतर्फे अंतरिक्ष प्रदर्शनाचे आयोजन

पुणे – इस्त्रोतर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान अंतरिक्ष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. इस्त्रोने प्रक्षेपण केलेल्या सर्व उपग्रहांचे मॉडेल्स तसेच चांद्रयान व मंगळयान अभियानाची क्षणचित्रे देखील या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ व इस्त्रो माजी समूह संचालक सुरेश नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सुरेश नाईक आणि “पुणेकर एज्युकेशनल इनिटिव्हिव्ह’चे व्यवस्थापकीय संचालक सुहास पुणेकर यांच्या पुढाकारातून हे प्रदर्शन होत आहे. या उपक्रमाचे सह-प्रायोजक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे अर्थात “सीओईपी’चे विद्यार्थी आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय माहिती मिळणार…
या प्रदर्शनात उपग्रह आणि त्याच्याशी संबंधित पोस्टर्सचा एक संच समाविष्ट आहे. ज्यामध्ये चंद्रयान व मंगळ मिशनचा समावेश आहे. यात उपग्रहाचे डिझाइन, बांधणी व प्रक्षेपण यांची सविस्तर माहिती शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

 

काय पाहता येणार…
इस्त्रोचे विविध रॉकेट्‌स व सध्या अंतराळात असलेल्या उपग्रहांचे मॉडेल देखील या प्रदर्शनात असतील. या प्रदर्शनाच्या वेळी इस्रोचे वेबपोर्टल भुवन व त्यांची वेबसाइट याचे प्रात्यक्षिक केले जाईल. हे प्रदर्शन केवळ इस्त्रोचे कार्य पोस्टर्स, मॉडेल्स व व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याइतके मर्यादित नसून यावेळी विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या संशोधकांशी भेटण्याची संधी मिळणार आहे. यात उपग्रहाचे मॉडेल शालेय विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

उपग्रहाचे रोमांचक क्षण
इस्त्रोतर्फे प्रक्षेपित होत असताना, जी परिस्थिती असते, तसाच अनुभव प्रदर्शनात पाहता येईल. क्‍युब-सॅट 15 ते 20 मीटरवर ड्रोनच्या साहाय्याने बघणे, ही विद्यार्थ्यांसाठी दुर्मीळ संधी राहील. हा उपग्रह पॅराशूटच्या मदतीने ड्रोनपासून वेगळा होतो आणि तो वातावरणातील तापमानाची माहिती विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्टेशनवर पाठवितो, अशी प्रात्यक्षिक पाहण्याची संधी प्रदर्शनात आहे, अशी माहिती सुरेश नाईक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)