व्यापाऱ्यांना अर्थसंकल्पातून मदतीची अपेक्षा

-कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होण्याची आवश्‍यकता

-जीएसटीत नोंदलेल्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शनची मागणी

नवी दिल्ली – अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) व्यापाऱ्यांना विशेष पॅकेज देण्याची विनंती केली आहे. या पॅकेजमध्ये देशभरातील सर्व नोंदणीकृत व्यापाऱ्यांना कम्प्युटरायझेशनच्या माध्यमातून जोडण्याची आणि स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देण्यविषयी नमूद करण्यात आले आहे.

सीएआयटीचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामध्ये जीएसटीअंतर्गत नोंदणी केलेल्या प्रत्येक व्यापाऱ्याला दहा लाख रुपयांपर्यंत अपघात विमा देण्याविषयी सुचविण्यात आले आहे. याशिवाय नोंदणीकृत व्यापाऱ्यांना कम्प्युटरायझेशनशी जोडून घेण्यासाठी कम्प्युटर अथवा तत्सम उपकरणांच्या खरेदीसाठी अनुदान देण्याचीही विनंती करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कारण, देशातील केवळ 35 टक्के व्यापारी कम्प्युटरचा उपयोग करतात, असा दावा संघटनेतर्फे करण्यात आला आहे. रिटेल व्यापारासाठी राष्ट्रीय धोरण आखावे, देशांतर्गत व्यापारासाठी वेगळ्या मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, रिटेल व्यापार आणि ई-कॉमर्स व्यापार नियंत्रित करण्यासाठी नियामक संस्थेची स्थापना करण्यात यावी आणि व्यापाऱ्यांनाही लघु-मध्यम उद्योजकांप्रमाणे कमी अथवा विशेष व्याजदराने कर्ज देण्यात यावे, आदी प्रमुख मागण्यांचा समावेश पत्रात करण्यात आला आहे.

सध्या देशातील केवळ पाच टक्के व्यापारीच बॅंका अथवा वित्तीय संस्थांकडून कर्जे प्राप्त करू शकतात. उर्वरित 95 टक्के व्यापाऱ्यांना आपल्या विविध वित्तीय गरजांसाठी खासगी सावकार, नातेवाइक आणि ओळखीपाळखीवर अवलंबून आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना स्वस्त दरात कर्जे उपलब्ध करून देण्याचे आवाहनही सीएआयटीतर्फे करण्यात आले आहे.
पेन्शन देण्याचीही विनंती

जीएसटीमध्ये नोंदणी झालेल्या सर्व व्यापाऱ्यांना केंद्र सरकारने पेन्शन योजना राबविण्याची विनंतीही सीएआयटीने केली आहे. या शिवाय जीएसटीला आणखी सुलभ करण्यासाठी देशभरातील मंड्यांमधील कर रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. जीएसटीमधील 18 टक्‍क्‍यांची पातळी रद्द करण्याचा विषयही व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. वाहनांचे सुट्टे भाग, सिमेंट आदी वस्तूंवर 12 टक्के जीएसटी आकारण्याचीही विनंती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)