मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लोकसभा निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी काही ज्योतिषी नाही किंवा मी पोपटलाही विचारलं नाही किती जागा येतील म्हणून एक्झिट पोलमध्ये जे दाखवलं ते होणार नाही असं आम्हाला वाटतंय’, ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे भाजपच्या गटात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.