पुणे – जुन्या मोटारसायकल, स्कूटर आणि मोपेडचे संकलन विनीत केंजळे यांनी 1982 पासून केले आहे. आता त्यांच्याकडे या वाहनांचा मोठा संग्रह तयार झाला आहे.
या संग्रहाचे रूपांतर संग्रहालयात करण्यात येणार असून डिसेंबर महिन्यात या वाहनांचे संग्रहालय महाबळेश्वर येथे सुरू होणार आहे. पुणेकरांनी या उपक्रमाला सुरुवातीपासून प्रतिसाद दिला असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ही वाहने बिबवेवाडी-कोंढवा रोडवर लाईटहाऊस या मॉलमध्ये विनामूल्य पाहण्यासाठी 29 सप्टेंबरपासून उपलब्ध करण्यात आली आहे.
दुर्मिळ वाहन प्रेमींना ही वाहने 7 ऑक्टोबरपर्यंत पाहण्यास उपलब्ध असतील. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विनीत केंजळे यांनी काढलेल्या पत्रकात केले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0