कलावंत लोकजीवनातील वेदनाशी जोडतो

नगर – कलावंताकडे संवेदनशील मन असते या संवेदनशीलतेतुनच कलावंताला जनसामान्याकडे कणवेने बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळते. लोकजीवनातील वेदनेशी, त्यातील सौंदर्यांशी या कणवेनेच कलावंत सहज जोडला जातो. समाजातील अधुरेपणाच्या या दुसऱ्या बाजुशी जोडणारी जाण चित्र-शिल्पकार अविनाश पडवळ यांच्या या कागदी शिल्पात दिसते, असे उद्‌गार चित्रकार व साहित्यिक श्रीधर अंभोरे यांनी काढले.

चित्र-शिल्पकार अविनाश पडवळ यांच्या कागदी शिल्पांचे प्रदर्शन पडवळ यांच्या शिष्यांनी सावेडीतील रावसाहेब पटवर्धन सभागृहात लावले होते त्याच्या उद्‌घाटनात अंभोरे बोलत होते. पडवळ यांच्या मातोश्री श्रीमती सुंदरबाई पडवळ, पक्षीमित्र डॉ.प्रा.सुधाकर कुर्हाडे, चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते.

अंभोरे म्हणाले, लोकजीवनाशी नाते सांगणाऱ्या सामान्य व्यक्तींना पडवळ यांनी आपल्या शिल्पांचा विषय केले. विशेष म्हणजे यासाठी वापरलेले माध्यमही कागदासारखे अनोखे आहे. आजवरच्या कला जीवनात कागदासारख्या तुलनेने नाजुक माध्यमाला शिल्पाकृतीचे माध्यम म्हणून स्विकारण्याचे धाडस बहुतेक कोणीच केलेले नाही. पडवळ यांची कागदी शिल्प हा देशातीलच नव्हे तर जगातील एकमेव प्रयत्न असेल असा विश्वासही अंभोरेंनी व्यक्त केला. चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांचे भाषण झाले. प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी आज प्रदर्शनाच्या निमित्ताने गुरु-शिष्य मेळ्याच्या धर्तीवर गुरु-मित्र मेळा भरल्याचे त्यांनी सांगितले.

लेखक-अनुवादक अरुण मांडे, कवी चंद्रकांत पालवे, चित्रकर प्रमोद रामदिन, अनिल डेंगळे, कला शिक्षक बाळकृष्ण गोटीपामूल, छायाचित्रकार संजय दळवी, प्राचार्य नुरील भोसले, कला प्राध्यापक ए. ए. सोनटक्के, चित्रकार वसंत विटणकर, कलावंत व प्रसारक राजेंद्र वहाडणे, चित्रकार प्रमोद जगताप, अरविंद कुडिया, चित्रकार ज्योती सतीश डेरेकर, निवेदक किरण डहाळे, नंदकिशोर आढाव, प्रा.राम दराडे, इंटेरीअर सजावटकार प्रवीण पडवळ आदी उपस्थित होते. अनिरुध्द भागवत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.जॉन उजागरे यांनी आभार मानले.

आई हीच गुरु

लहानपणी झोपडीवजा घरात आई भिंतींना मातीने पोथारायची, लाकडाच्या काडीला कापडाची चिंधी बांधून ब्रश करायची व गेरु व चुन्याच्या सहाय्याने अशी नाग व पशु पक्षाची चित्र काढायची, माझ्यासाठी तोच डेमो (प्रात्यक्षिक) असायचा. अंभोरे यांनी ही हृद्य आठवण सांगुन व्यासपीठावर विराजमान पडवळ यांच्या मातोश्रीं विषयी व्यक्त केलेली कृतज्ञता आई हीच गुरु असल्याची भावना श्रोत्यात पसरवून गेली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)