मुंबईतील पंचतारांकित हॉटेल बाहेर निदर्शने

मुंबई – कर्नाटकातील ज्या 11 आमदारांनी सत्त्ताधारी आघाडीचा राजीनामा दिला आहे त्या आमदारांना मुंबईतील सोफीटेल हॉटेल मध्ये ठेवण्यात आले आहे. त्या हॉटेल बाहेर आज युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून या आमदारांना राजीनामे मागे घेण्यासाठी दबाव आणला. त्यावेळी पोलिसांनी तेथे हस्तक्षेप करून निदर्शक कार्यकर्त्यांना तेथून हुसकाऊन लावले.

या हॉटेल बाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला असून हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही जादा पोलिस तैनात ठेवण्यात आले आहेत. भाजपच्या लोकांनी हे आमदार पळवून आणून येथे कोंडून ठेवले आहेत असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न काहीं पत्रकारांनी केला असता त्यांनाही मज्जाव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)