शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला हद्दपार करा : ना. रामराजे नाईक निंबाळकर

वाई – देशाच्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा नष्ट करण्याच्या भूलथापा मारून सामान्य जनतेसह कष्टकरी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या मोदी सरकारला देशातील सामान्य जनता होवू घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे मोदी सरकार महराष्ट्रातून हद्दपार करा, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. ते करंजखोप मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ना. रामराजेनी सर्व बाजूनी अपयशी ठरलेल्या केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारवर तोंड सुख घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शामराव शिंदे होते. यावेळी करंजखोप-सोनके रस्त्याच्या कामाचे, करंजखोप मधील ग्रामपंचायत इमारतीचे, अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन ना. रामराजे नाईक निंबाळकर व प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी चवणेश्वर विकास आघाडीने पाठपुरावा करून दीड कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक- नितीन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष- बाळासाहेब सोळसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, मोदी सरकारने कुणालाही विश्वासात न घेता नोटा बंदीचा निर्णय देशातील जनतेवर लादला आहे. त्यामुळे देशातील कृषीविषयक आर्थिक घडी पूर्णपणे मोडकळीस आली आहे. सहकार मोडीत काढत मोदी सरकारने ग्रामीण भागाशी निगडीत असणारी सहकारी बॅंका, पतसंस्था व विकास सेवा सोसायट्या निर्बंध लादल्याने ही चळवळ मोडीत काढण्याचा कुटील डाव खेळण्यात आला.

चवणेश्वर विकास आघाडीने प्रा. शामराव शिंदे म्हणाले, यशवंतनगर वाई येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निवडणुकीत 16-0 करण्यासाठी ज्या पद्धतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ बांधून यश संपादन केले आहे. तोच फार्म्युला वापरून करंजखोप गावांचा सर्वांगीण विकास साधणार आहे.प्रा. शामराव शिंदे यांचा ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विशेष सक्तार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक- सरपंच- लालासाहेब नेवसे यांनी , सूत्रसंचालन, व आभार- उपसरपंच-संदीप धुमाळ यांनी मानले.फोटो : करंजखोप नावाने सेव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)