वनरक्षक पदासाठी उद्या परीक्षा

यापूर्वी तांत्रिक कारणामुळे रद्द झाली होती प्रक्रिया

पुणे – वनरक्षक पदासाठी राज्य सरकारतर्फे भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. दि.9 ते 22 जूनदरम्यान आयोजित या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणीमुळे पुण्यातील परीक्षा होऊ शकली नव्हती. ही परीक्षा 25 जून रोजी होणार आहे.

राज्यातील सर्व शासकीय विभागांतील रिक्त पदे भरण्याबाबत शासन धोरण निश्‍चित करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार वनविभागांतर्गत वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. याअंतर्गत राज्यात विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. 9 ते 22 जून दरम्यान झालेल्या परीक्षेत राज्यभरातील 128 परीक्षा केंद्रांवर 3 लाख
82 हजार 951 उमेदवारांपैकी 2 लाख 46 हजार 606 उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे.

मात्र 9 व 10 जून रोजी यवतमाळ येथील डॉ. भाऊसाहेब नांदूरकर कॉलेज ऑफ इंजिनियरिंग या संस्थेत व पुणे येथील अलार्ड ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे परीक्षा होऊ शकली नाही. सदर परीक्षा नव्याने घेण्यात येतील, अशा सूचना महापरीक्षा संकेतस्थळावर तसेच परीक्षास्थळावर प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.

त्यानुसार रद्द झालेल्या परीक्षा दि.25 जून रोजी यवतमाळ येथील डॉ. भाऊसाहेब नांदूरकर कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, मार्कंडेय पब्लिक स्कूल व पुणे येथे अलार्ड ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेत आयोजित करण्यात आली आहे, त्या संदर्भात संबंधित उमेदवारांना सूचना, नवीन हॉल तिकीट पाठवण्यात आले असल्याचेही वनविभागाने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)