प्रवास भत्ता वसुल करण्यासाठी विमानाची खोटी तिकीटे दिली माजी खासदाराला तीन वर्षांचा कारावास

नवी दिल्ली: प्रवास भत्ता वसुल करण्यासाठी एका माजी खासदाराने विमानाची खोटी तिकीटे संसदेच्या सचिवालयाला सादर केली. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात संबंधीत खासदाराला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ल्हामिंग लायना असे या खासदाराचे नाव असून ते मिझो नॅशनल फ्रंट या पक्षाचे राज्यसभेचे माजी सदस्य आहेत. ते मिझारोम मधून राज्यसभेवर निवडून गेले होते. ते दोन वेळा खासदार होते. त्यांना अकरा लाख रूपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.

या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी त्यांना अंतरीम जामीन कोर्टाने मंजुर केला त्यामुळे त्यांना आज अटक करण्यात आली नाही. त्यांनी सन 2012-13 साली विमान प्रवासाची तीन बोगस ई तिकीटे सादर करून राज्यसभा सचिवालयाकडून टीए बिल वसूल केले होते. तसेच विमानाचे प्रत्यक्ष तिकीट 81 हजार 373 रूपये इतके असताना त्यांनी प्रत्यक्षात 11 लाख 19 हजार 926 रूपये वसुल केले होते. सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)