शाब्दिक टिपण्णी करणाऱ्या इंग्लंडच्या ‘त्या’ माजी कर्णधाराने केली विराटची प्रशंसा !!!

भारताचा कर्णधार विराट कोहली याने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन करताना १४९ धावांची उत्तम खेळी केली. मागील इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीचा त्याच्या मानसिकतेवर काही परिणाम जाणवला नाही. भारताचे मुख्य फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर त्याने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत ही शतकी खेळी साकारली. मागील दौऱ्यात त्याने ५ कसोटी सामन्यातील १० डावात मिळून १३ च्या सरासरीने १३४ धावा केल्या होत्या. या दौऱ्यात एकाच डावात त्याने १४९ धावा केल्या.

विराटच्या खेळीचे अनेक आजी-माजी खेळाडूंनी कौतुक केले. यात इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन  यांचा देखील समावेश आहे. कसोटी मालिका सुरु होण्याच्या अगोदर वॉन यांनी शाब्दिक युद्ध छेडले होते. ते सतत काहीतरी टिप्पणी करत होते. कधी त्यांचे लक्ष्य विराट कोहली असायचा तर कधी आदिल रशीद. रशीद याला कसोटीत स्थान दिलेल्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

विराटच्या या शतकी खेळीनंतर आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून वॉन यांनी विराटच्या खेळीचे कौतुक केले. ते म्हणाले “ही अविश्वसनीय खेळी आहे. हलत्या चेंडूविरुद्ध हे एकाचे युद्ध होते.”
विराटच्या या शतकी खेळीचे अन्य खेळाडूंनी देखील कौतुक केले त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा यांचा समावेश आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)