मध्यप्रदेशात मतदानानंतर २ दिवसांनी ईव्हीएम पोहोचली ‘स्टोरेज’ रूमला

भोपाळ : मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मध्यप्रदेशात मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे तब्बल 48 तासांनी कलेक्‍शन सेंटर्स मध्ये पोहचवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेवर कॉंग्रेसने जोरदार आक्षेप घेतला असून सागर जिल्ह्यात घडलेल्या या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसद्वारे करण्यात येत आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने मात्र असे काही घडलेच नसल्याचे सांगत कलेक्‍शन सेंटर मध्ये उशिरा नेण्यात आलेली मतदार यंत्रे जादाची यंत्रे होती, त्यांचा मतदानासाठी वापर करण्यात आला न्हवता तसेच सदर यंत्रे पोलिस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आली होती असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

-Ads-

सदर घटना घडलेला मतदारसंघ हा मध्यप्रदेशचे गृहमंत्री भुपेंद्रसिंग यांचा असून येथे त्यांची लढत कॉंग्रेसचे अरूणोदय चौबे यांच्याशी होत आहे. मध्यप्रदेश कॉंग्रेसने याबाबत एक ट्विट करत गंभीर आरोप लावले असून काँग्रेसने केलेल्या आरोपांनुसार ‘मतदान झाल्यानंतर ही मतदान यंत्रे भुपेंद्रसिंग यांच्या मालकीच्या हॉटेल्स मध्ये नेण्यात आली. नंतर ही यंत्रे नंबर प्लेट नसलेल्या बस मधून अन्यत्र हलवण्यात आली. ज्या कलेक्‍शन सेंटर मध्ये ही यंत्रे त्वरेने पोहचणे अपेक्षित होते तेथे ही यंत्रे 48 तास उशिराने पोहचली.’ या प्रकाराची त्वरीत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कलेक्‍शन सेंटर बाहेर काल जोरदार निदर्शने देखील केली होती.

भाजपाने मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगताना या प्रकणापासून आपले हात झटकले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
4 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)