हॉटेलमध्ये आढळल्या ईव्हीएम मशीन्स, बिहारच्या मुझ्झफरपूर मतदार संघातील घटना

मुझफ्फरपूर – पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना मुझफ्फरपूर येथील एका हॉटेलमध्ये दोन ईव्हीएम सापडल्याने खळबळ उडाली होती. हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन्स सापडल्याची माहिती मिळताच गोंधळ उडाला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्‍टर मॅजिस्ट्रेट अवदेश कुमार यांच्याकडे मुझफ्फरपूर येथील चार ईव्हीएम मशीन्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परिसरातील ईव्हीएम मशीन खराब झाल्यास बॅक अप म्हणून या मशीन्स ठेवण्यात आल्या होत्या.

मुझफ्फरपूर येथून मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर ड्रायव्हरने आपल्याला मतदान करायचे असल्याने थोडा वेळ मागितला. यावेळी अवधेश कुमार हॉटेलमध्ये ईव्हीएमसह उतरले होते. काही वेळात निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन हॉटेलमध्ये थांबले असल्याची बातमी परिसरात पसरली. कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली.
यानंतर उप-विभागीय अधिकारी कुंदन कुमार हॉटेलमध्ये पोहोचले आणि ईव्हीएम मशीन्स जप्त केल्या.

सेक्‍टर ऑफिसरला काही आरक्षित अतिरिक्त मशीन्स देण्यात आल्या होत्या. ईव्हीएमची बदली केल्यानंतर त्यांच्याकडे दोन ईव्हीएम, 1 कंट्रोल युनिट आणि दोन व्हीव्हीपॅट त्यांच्या राहिल्या होत्या. मुझफ्फरपूरचे जिल्हा दंडाधिकारी आलोक रंजन यांनी सांगितले की, त्यांनी या मशीन्स हॉटेलमध्ये घेऊन जाण्यास नको होते. नियमांचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी केली जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)