नगरमध्ये उमेदवारीच्या अनिश्‍चिततेमुळे सर्व काही संघर्षमय !

नगर: कॉंग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नगरचे राजकारण चांगलेच तापले आहे. डॉ. विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर लोकसभेसाठीच्या नगर मतदार संघातील राजकीय समीकरणांवर परिणाम झाला आहे. खासदार दिलीप गांधी यांचे राजकीय भवितव्य काय, असेल हे सांगणे त्यांनाही अवघड झाले आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीकडून कोणता उमेदवार जाहीर होतोय याचीच उत्सुकता आहे. डॉ. विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने कॉंग्रेसच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. हे कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवारांबरोबर राहतात की, डॉ. विखे पाटील यांच्याबरोबर हा येणारा काळच निश्‍चित करेल. भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जोपर्यंत उमेदवार निश्‍चित होत नाही, तोपर्यंत हे राजकीय समीकरणे संघर्षमय असणार हे तेवढचं खरं!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)