प्रत्येक निवडणूक लढविणाऱ्या के. आर. गौरी

– द. वा. आंबुलकर 

केरळमधील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या असणाऱ्या के. आर. गौरी या 99 वर्षीय महिला कार्यकर्त्यांनी 1957 पासून झालेल्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत उभे राहून प्रत्येक निवडणूक लढविण्याचा एक आगळा-वेगळा राजकीय विक्रम साधला आहे.

के. आर. गौरी यांच्या राजकारणाच्या प्रवासातील विक्रमी सुरुवात पण तसे पाहता एका राजकीय विक्रमाने झाली. 1957 मध्ये केरळमध्ये प्रथमच आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आलेल्या गौरी ई. एम. एस. नंबुद्रीपाद यांच्या मंत्रिमंडळातील पहिल्या महसूलमंत्री व महिला मंत्री बनल्या व नंबुद्रीपाद यांचे त्यावेळचे मंत्रिमंडळ-सरकार हे जगाच्या साम्यवाद आणि साम्यवाद्यांच्या इतिहासातील पहिले निर्वाचित मंत्रिमंडळ ठरले हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

त्यानंतरच्या सुमारे 50 वर्षांच्या आपल्या साम्यवादी राजकीय वाटचालीत के. आर. गौरींच्या “गौरी अम्मा’ झालेल्या या महिलेने अनेक राजकीय चढ-उतारांसह विविध उपक्रम-विक्रम केले आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. 92 वर्षीय गौरी अम्मा यांनी 1957 पासून म्हणजेच केरळ राज्याची निर्मिती झाल्यापासूनची प्रत्येक निवडणूक लढविली असून त्याआधी 1948 मध्ये त्रावणकोर येथून तर 1954 मध्ये कोचीन येथून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविली होती हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

गौरी अम्मा यांच्या निवडणूकविषयक राजकीय वैशिष्ट्य म्हणजे 1957 पासून त्यांनी एकूण 16 सार्वजनिक निवडणुका लढविल्या असून त्यापैकी 13 निवडणुका त्यांनी जिंकल्या तर केवळ 3 निवडणुकी त्या हरल्या व अशा प्रकारे त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात हार-जीत या संदर्भात 3ः13 या आकडेवारील एक नवा आयाम पण दिला आहे. गौरी अम्मा यांचा निवडणुकीतील पराभव 1948, 1977 व 2006 या वर्षी त्यांनी लढविलेल्या निवडणुकीत म्हणजेच दर 29 वर्षांनी झाला आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

गौरी अम्मांनी प्रसंगी मार्क्‍सवादी पक्षांशी झालेले आपले मतभेद लपवून न ठेवता स्वतःच्या “जनतिपथ्य संरक्षण समिती’ या राजकीय संघटनेची स्थापना केली व प्रसंगी 2001 मध्ये कॉंग्रेस निमंत्रित राजकीय आघाडीच्या नव्या मंत्रिमंडळात पण त्या नव्याने सामील झाल्या होत्या. परिणामी केरळमधील कम्युनिस्टांपासून- कॉंग्रेसपर्यंतच्या सर्व राजकीय पक्ष-आघाड्यांसह काम करणाऱ्या गौरीअम्मांना सर्वजण केरळच्या राजकारणातील “पोलादी महिला’ म्हणूनच संबोधित करतात.

आपल्या सुरुवातीच्या उमेदीच्या वा उमेदवारीच्या काळात पोलिसांनी बंदुकीसह त्यांना केलेल्या मारहाण आणि अत्याचारांच्या संदर्भात गौरीअम्मांची टिप्पणी म्हणजे “माझ्यावर माझ्या तरुणपणी पोलिसांनी पोलिसी बंदुकांच्या दस्त्यांनी एवढे अनन्वित अत्याचार केले होते की मी त्यावेळी एखाद्या बंदुकीलाच जन्म दिला असता.” नंतरच्या काळात त्याच केरळी पोलिसांनी आपल्या बंदुकांसह मंत्री झालेल्या गौरीअम्मांना मानवंदना दिली हा भाग वेगळा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)