#HBD व्हिडीओ : सदाबहार गुलजार… बर्थ डे स्पेशल

रेहमानच्या स्टुडिओमध्ये ‘छय्या- छय्या’ गाण्याचे शूटिंग सुरु होणार होते. इतक्यात पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान  केलेला आणि चेहऱ्यावर देखील तेवढीच फकीराची स्थिरता असलेल्या  एका व्यक्तीचे आगमन  झाले. रेहमानने बांधलेल्या चालीवर लेखणीतून शब्द झरझर उतरले. ‘जिसके सर हो इश्क की छाव , पेर के नीचे जन्नत होगी.’ पाहता पाहता एक अजरामर गाण्याचा जन्म तेथे झाला. या  वातावरणाचा नूर बदलून टाकणाऱ्या त्या कलाकाराचे नाव होते संपूरन सिंग, म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके गुलजार साहेब.

जवळपास सगळ्याच पिढ्यांशी त्यांच्या लेखणीची नाळ जोडली गेली अश्या कवी, लेखक गीतकारांमध्ये गुलज़ारांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागते. आपण सर्वांनीच या ना त्या  गाण्यांमधून गुलज़ारांचा सहवास अनुभवला आहे. जंगल जंगल बात चाली हैपता चला है, या गाण्यापासून ते आज कल पाव जमी पर नही पडते मेरे, आपकी आँखों मैं  पासून ते दो दिवाने शहरमे, मेरा कूछ  सामान तुम्हारे पास है  अश्या गीतांमधून गुलज़ारांनी  जीवनाच्या सगळ्याच बाजुंना स्पर्श केला आहे.

दिल्लीमध्ये कार मॅकेनिक म्हणून काम करणाऱ्या गुलज़ारची विमल रॉय यांच्याशी पहिली ओळख शैलेंद्र यांनी करून दिली. बंदिनी या चित्रपटासाठी त्यांनी ‘मेरा गोरा अंग ले ले ‘ हे सुंदर गीत लिहले व एका नितांत प्रवासाची सुरुवात झाली. गुलज़ारांनी विमलदा यांच्यासोबत पुढे बरंच काम केले. कोशिश, खामोशी, आंधी ,मोसम अश्या अनेक चित्रपटातून आपल्या लेखनाची जादू त्यांनी दाखविली. विमलदा बद्दलची कृतज्ञता त्यांनी अजून जपलेली आहे.

ह्रषिकेश मुखर्जी यांच्यासोबाबत देखील त्यांचा विशेष स्नेह राहीला. गीतकारांबरोबरच ,संवादलेखक , पटकथालेखक म्हणून ह्रिषीकेशजींनी त्यांना भरपूर संधी दिली. आनंद, नमक हराम या चित्रपटांसाठी त्यांनी काही अजरामर संवाद लिहले.

गीतकार म्हणून त्यांनी सर्वच संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले परंतु आर. डी. यांच्याबरोबर त्यांचा विशेष जिव्हाळा होता. तुजसे  नाराज नाही, आनेवाला पल ,तेरे बिना जिया जाये ना .अशी कित्येक बहारदार गाणी या जोडीने दिली. स्वत: दिग्दर्शक म्हणून काम पाहत असताना त्यांनी संगीताची जबाबदारी आरडी यांच्यावरतीच  दिली.

रेहमान बरोबर ‘तेरे बिना’, विशाल भारद्वाराज यांच्यासोबत कमीने, शंकर एहसान लॉय, विशाल शेखर, साजिद-वाजिद, याबरोबरच एसडी बर्मन, शंकरा जयकिसन, हेमंत कुमार,लक्ष्मीकांत  प्यारेलाल, अनु मलिक अश्या अनेक पिढ्यांशी त्यांनी नाळ जोडनारी त्यांची लेखणी आहे. कवी- गीतकारांनी साद चिरतरुण राहत बदलत्या काळाचीससंपादने टिपली पाहिजेतअसे त्यांना वाटते.

उर्दू भाषेवर त्यांचे विशेष प्रेम राहिले. १९८८मध्ये डीडी वरती आलेली  मिर्झा गालिब सिरीयल ही त्यांच्या करीयरमधील महत्वाचा टप्पा आहे. रुह देखी है कभी सास लेना भी कैसी आदत है, वो जो शायर था चूप सा रहता था अश्या कित्येक काव्यातून गुलजार आपल्या मोहात पडत राहतात. राष्ट्रीय पुरस्कार, ऑस्करव ग्रॅमी मिळालेले एकमेव गायक म्हणून त्यांच्याकडे पहिले येईल.

जिसका भी चेहरा छीला तो कोई और निकाला, मसुमसा कबुतर नाचा तो मोर निकाल !हे इतके साधं सरळ फक्त गुलज़ारच लिहू शकतात. जिसके सर हो इश्क की छाव, पेर के नीचे जन्नत होगीअसे लिहण्यासाठी हर एक श्वासाला भरभरून जिगण्याचा ध्यास असावा लागतो.

‘जिंदगी क्या है ये समजने के लिये जिंदा रहना बहोत जरुरी है’ असं म्हणत गुलजार सदाबहार आहेत चीर तरुण आहेत. त्यांना दैनिक प्रभात तर्फे जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!

ऋषिकेश कदम 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
25 :thumbsup:
13 :heart:
1 :joy:
10 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)