कोवळ्या कृषिकन्यांचीही फारच वाटतेय भीती

सत्तापक्षातील आमदार, नामदार
बघा भेदरट आहेत किती
कोवळ्या कृषिकन्यांचीही
त्यांना फारच वाटतेय भीती

विरोधातील आवाज दडपणे
हीच तर सत्ताधारी पक्षांची नीती
कोंबडे नक्कीच ओरडणार
झाकायचा प्रयत्न करा किती

आई-बापांच्या पिढ्या खपल्या
आता कृषिकन्या जागी झाली
उपोषणाचे सहा दिवस उलटले
मग मुर्दाड शासनाला जाग आली

सगळ्या पक्षांचे अनुभव घेतले
शेतकऱ्यांना नाही कुणीच वाली
पन्नास-साठ हेक्‍टरच्या मालकावरही
आत्मघात करण्याची वेळ आली

रात्री-अपरात्री शासकीय दहशत
नेते स्वकीय म्हणावेत की परकीय
अनेक जीवनावश्‍यक बाबींनाही
स्वार्थी नेत्यांनी बनविले राजकीय

लाखांचा पोशिंदा हा शेतकरी
सुखी होणे नक्कीच नाही सोपे
वर्षानुवर्षे सत्ता राबविताहेत
बनेल बदमाश बदनाम भोपे

मंत्रिपदावर आहात म्हणून
नामदारांनो रुबाब नका गाजवू
शेतकऱ्यांना वाजवी भाव द्या
अन्यथा रस्त्यावर धरून वाजवू

शांततेने उपोषण करणाऱ्या
कन्यांना दहशतीने उचलून नेले
सत्तेचा माज दाखवून नेत्यांनी
अतिशय चुकीचे काम केले

या जागरूक धाडसी कन्या
शासनाकडे भीक नाही मागत
महाराष्ट्रातील कष्टकरी बळिराजा
नक्षलवाद्यांसारखा नाही वागत

राजकारण्यांनो बेधुंदपणे वागणे
तुम्हाला सोडावे लागेल आता
सत्तेत राहून माया जमवता
बकासुरांनो अजून किती खाता
                  – विजय वहाडणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)