अशिक्षित असले तरीही…

के. कामराज हे जरी अशिक्षित असले तरी त्यांनी करून दाखवलेले कार्य भल्या भल्या शिक्षित राजकारण्यांना जमलेले नाही.

के. कामराज यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला व आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले. केवळ सहा वर्षे त्यांना शिक्षण घेता आले. यानंतर त्यांनी काम करायला सुरुवात केली. कमराज हे स्वातंत्र्यसैनिकही होते. जालियनवाला बाग हत्याकांड हे त्यांच्या राजकीय प्रवेशाचे मुख्य कारण होते. त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातर्फे अनेकदा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. 1940 मध्ये तमिळनाडू कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

1954 मध्ये कमराज तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले. त्यावेळी इंग्रजीविषयीची माहिती नसणारे ते एकमेव आणि पहिले मुख्यमंत्री होते. मात्र त्यांच्या नऊ वर्षांच्या प्रशासन काळात तमिळनाडू भारततात प्रशासनाबाबत सर्वश्रेष्ठ असणाऱ्या राज्यांमध्ये अग्रेसर होता. गांधीजींच्या विचारांचे अनुयायी असलेले कमराज यांनी 2 ऑक्‍टोबर 1975 रोजी म्हणजेच गांधी जयंती दिवशी जगाचा निरोप घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)