युरेनियमची समृद्धता न वाढवण्याचे युरोपिय संघचे इराणला आवाहन

ब्रुसेल्स (बेल्जियम) – 2015 च्या अणू करारानुसार युरेनियमच्या समृद्धीची मर्यादा धुडकावण्याचा इराणच्या निर्णयावर युरोपिय संघाने चिंता व्यक्‍त केली आहे. इराणने ही मर्यादा ओलांडू नये. ही मर्यादा धुडकावण्याबाबतचा आपला निर्णय बदलावा, असे आवाहन युरोपिय संघाच्यावतीने इराणला करण्यात आले आहे.

युरेनियम समृद्ध करण्याची मर्यादा काही तासांमध्येच आपण ओलांडणार आहोत, असे इराणने रविवारी म्हटले होते. तसेच 3.7 टक्के युरेनियम समृद्ध करण्याची मर्यादा असताना 4.5 युरेनियम समृद्ध केले असल्याचे इराणने सोमवारी जाहीर देखील करून टाकले होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्यावर्षी या करारातून बाहेर पडण्याची एकतर्फी घोषणा केल्यापासून अणि इराणवर निर्बंध लादल्यापासून इराणनेही प्रथमच या कराराच्या बांधिलकीबाबतची घोषणा केली आहे.

मात्र इराणने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे युरोपिय संघाच्या प्रवक्‍त्या माजा कोचिजन्सिक यांनी पत्रकारांना सांगितले. संयुक्‍त राष्ट्राच्या अणू उर्जा अधिकाऱ्यांच्या अहवालाची युरोपिय संघ वाट बघत आहे. तसेच पुढील कृतीबाबत या अणू करारातील अन्य भागीदार देशांबरोबर चर्चाही करणार अहे, असेही त्या म्हणाल्या.

इराणबरोबरच्या अणू करारातील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि चीन या अन्य भागीदार देशांनी इराणची अण्वस्त्रसज्जता रोखण्यासाठी हा करार हा एकमेव योग्य पर्याय शिल्लक असल्याचे म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here