युरोपियन महासंघाकडून गुगल कंपनीला मोठा दंड

लंडन – युरोपियन महासंघाने प्रतिस्पर्धात्मक कायद्याचा भंग केल्याच्या कारणावरून गुगल कंपनीवर 149 कोटी युरो इतका दंड ठोठावला आहे. या अगोदरही या प्रकारची कारवाई गुगलवर करण्यात आली आहे. यात गुगलकडून ऑनलाईन सर्च करण्यात आलेल्या जाहिराती या अन्य कंपन्याकडून सादर करण्यात येणाऱ्या जाहिराती बंद किंवा ब्लॉक करण्यात येण्याचा आरोपही कंपनीवर करण्यात आला आहे.

अनेक वेबसाईटवर गुगल सर्च हा ऑप्शन असतो. व कोणत्याही यूजर्सकडून त्याचा वापर केल्यास त्याला सर्च इंजिनवर जाहिरातीही दिसत असतात. गुगल या सर्च करण्यात येणाऱ्या अन्य कंपन्याच्या जाहिराती ब्लॉक करत असल्याचा आरोप निश्‍चित करूनच ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे.

युरोपियन महासंघाने आपला निर्णय सादर करताना म्हटले आहे की गुगलने 2006 ते 2016 या कालावधीत ऑनलाईन मार्केटमध्ये आपल्या दबदब्याचा गैरफायदा घेतल्याचेही आहे. यामुळे तिसऱ्या पार्टीत असणाऱ्या कंपनीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यावर बंदी लावली जात होती. त्यामुळेच मायक्रोसॉफ्टवर कारवाई करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)