#लोकसभा2019 : देशात चौथ्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 49.53 टक्के मतदान

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत.

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागा, उत्तर प्रदेश-राजस्थानातील प्रत्येकी 13-13 जागा, पश्चिम बंगालमधील 8 जागा, मध्य प्रदेश-ओडिशातील 6-6 जागा, बिहारमधील 5 जागा, झारखंडतील 3 जागा आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.

9 राज्यांतील मतांची टक्केवारी (दुपारी 3 वाजेपर्यंत)

बिहार – 44.23 %
जम्मू आणि काश्मीर – 8.42%
झारखंड 56.37%
मध्यप्रदेश 55.22%
महाराष्ट्र 41.15%
ओडिशा 51.54%
राजस्थान 54.16%
उत्तर प्रदेश 44.16%
पश्चिम बंगाल 66.01%

एकूण : 49.53%

https://twitter.com/ANI/status/1122808484884467712

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)