लैंगिक छळाचे प्रकार रोखण्याच्या उद्देशातून मंत्रिगटाची स्थापना 

मी टू मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारचे पाऊल

नवी दिल्ली – कार्यस्थळी होणारे लैंगिक छळाचे प्रकार रोखण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारने बुधवारी मंत्रिगटाची स्थापना केली. लैंगिक शोषणाशी संबंधित मी टू मोहीम तीव्र बनल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह संबंधित मंत्रिगटाचे नेतृत्व करणार आहेत.

मंत्रिगटाच्या इतर सदस्यांमध्ये नितीन गडकरी, निर्मला सीतारामन्‌ आणि मेनका गांधी या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. कार्यस्थळी होणारे लैंगिक छळाचे प्रकार हाताळणाऱ्या कायदेशीर चौकटींची छाननी मंत्रिगट करेल. त्या कायदेशीर चौकटी आणखी मजबूत बनवण्यासाठी आणि सध्या अस्तित्वात असणाऱ्या तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रिगट तीन महिन्यांत आपल्या शिफारसी सादर करेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यस्थळी महिलांची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध असल्याचे नमूद करत सरकारने मंत्रिगट स्थापन केला आहे. मागील काही दिवसांत मी टू मोहिमेंतर्गत अनेक महिलांनी विविध क्षेत्रांतील व्यक्तींविरोधात आवाज उठवला. त्या मोहिमेचे पडसाद उमटून आरोपांचे लक्ष्य ठरलेल्या एम.जे.अकबर यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)