अयोध्या प्रश्‍नी विशेष खंडपीठाची स्थापना; 10 जानेवारीपासून होणार नियमित सुनावणी

नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद वादग्रस्त भूखंडप्रकरणी नियमित सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाचे गठण केले आहे. या विशेष खंडपीठात सरन्यायाधिश रंजन गोगई, न्या. एस. ए. बोबडे, एन. व्ही. रमन्ना, यू. यू. ललित आणि डी.वाय. चंद्रचुड यांचा समावेश आहे. हे खंडपीठ 10 जानेवारीपासून या प्रकरणाची नियमित सुनावणी करणार आहे.

यावर नियमित सुनावणी करावी की नाही, यासंदर्भात 4 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी ही सुनावणी केवळ 60 सेंकदात संपली होती. 10 जानेवारीपासून नियमित सुनावणी होणार असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानंतर आज विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्येतील 2.77 एकर जागा सुन्नी वक्‍फ बोर्ड, निर्मोही आखाडा व राम लल्ला यांना सारख्या प्रमाणात वाटून देण्याचा निकाल 2010 मध्ये दिला होता. त्यावर 14 अपिले प्रलंबित आहेत. एकूण चार दिवाणी दाव्यांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने जमीन सारखी वाटण्याचा निकाल दिला होता. गेल्या 29 ऑक्‍टोबरला न्यायालयाने रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादावर योग्य खंडपीठामार्फत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी केली जाईल, असे जाहीर केले होते. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी करणारा अर्ज हिंदू महासभेने केला होता.

राम मंदिराचा प्रश्न कॉंग्रेसमुळेच रखडला आहे. कॉंग्रेसच्या ज्या नेत्यांनी वकिलपत्र घेतलीत त्यांनीच त्यात अडथळे आणलेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत केला होता. हा प्रश्न लवकर निकाली निघावा असे वाटत असेल तर कॉंग्रेसने आपल्या नेत्यांना सांगितले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)