एस्पेनिओल वरिल विजयात मेस्सीची चमक

बार्सिलोना: लियोनेल मेस्सीने सामन्याच्या शेवटी झळकविलेल्या दोन गोलच्या जोरवर बार्सिलोना संघाने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत कॅटलान डर्बीमध्ये एस्पेनिओल संघाचा 2-0 असा पराभव केला. या विजयासह बार्सिलोना संघाने लीगमधील आपले पहिले स्थान कायम राखत 13 गुणांची आघाडी घेतली आहे. या सामन्यातील दोन गोलमुळे मेस्सीने या मोसमात 40 गोल झळकावत सलग दहा वर्षी आशी कामगिरी करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
सामन्याच्या पाहिल्या काही मिनिटांपासूनच बार्सिलोना संघाने सामन्यावर आपले वर्चस्व स्थापन करत चेंडूवर जास्तीत जास्त वेळ ताबा ठेवला. परंतु इस्पेनिओल संघाने 9 खेळाडू बाचावाफळीत ठेवत वेगळीच रणनीती आखली होती. त्यामुळे पाहिल्या काही आक्रमक चाली रचूनही बार्सिलोनाला गोल करण्यात अपयश येत होते. त्यामुळे पहिले सत्र गोल विनाच पार पडले.

दुसऱ्या सत्रात बार्सिलोनाचा प्रशिक्षकांनी काही बदल केले. 70 व्या मिनिटाला मेस्सीने फ्री किक मिळवली आणि त्यावर गोल करत बार्सिलोनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 89 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत मेस्सीने बार्सिलोना चा विजय निश्‍चित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)