बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओलच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. ईशा आणि भरत तख्तानी यांच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. यासंबंधीची माहिती स्वतः ईशाने सोशल मीडियातून दिली आहे. ईशाने आपल्या नवजात मुलीचे मिराया तख्तानी असे नावही ठेवले आहे. सध्या त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव राध्या असे आहे.
ईशाने सोशल मीडियावर मिराया तख्तानी नावाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला लाखो चाहत्यांनी लाइक केले असून त्यांनी ईशा आणि राध्यालाही शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, भरत आणि ईशा यांना लग्नाचा पाच वर्षानंतर राध्या ही पहिली मुलगी झाली होती. ईशाची आई हेमा मालिनी यांना उत्तर प्रदेशातील मथुराशी विशेष लगाव आहे. तेथील भगवान कृष्ण यांच्या त्या भक्त असल्याने ईशाने त्यांच्या मुलीचे नाव राध्या असे ठेवले होते.
https://www.instagram.com/p/ByjjuPjHD_s/?utm_source=ig_web_copy_link