निवडणुकामुळे इपीएफओचा व्याजदर 8.55 टक्‍के राहणार

कर्मचाऱ्यांच्या किमान निवृत्तिवेतनात दुप्पटीने वाढ होणार?

नवी दिल्ली – निवडणुकामुळे केंद्र सरकारकडून पीएफच्या व्याजदरात कोणताच बदल केला जाणार नसून पीएफचा व्याजदर 8.55 टक्‍के राहण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशातील 6 कोटी पीएफ खातेधारकांना याचा फायदा होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या (सीबीटी) गुरुवारच्या बैठकीत याचा निर्णय होईल. किमान निवृत्तिवेतनात वाढ करून ती दुप्पट केली जाऊ शकते. बैठकीत यावर सहमती झाली तर इपीएफओच्या पेन्शन स्कीमचा सुमारे 50 लाख खातेधारकांना फायदा मिळेल.

सीबीटीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सीबीटीच्या बैठकीपूर्वी एफआयएसीची बैठक होणार आहे. या बैठकीत पीएफ व्याजदर किती राहील हे स्पष्ट होईल. या व्याजदरात बदल केली जाण्याची शक्‍यता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीबीटी ही एक त्रिपक्षीय समिती आहे. यामध्ये सरकार, कर्मचारी आणि श्रम मंत्रालयाच्या कामगार संघटनांचे प्रमुख सहभागी होतात. इपीएफओचे सर्व महत्वाचे निकाल सीबीटीद्वारे घेतले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)