ठाण्यात उद्योजकाची हत्या

ठाणे- दुबई येथे हॉटेल व्यवसाय करणा-या एका उद्योजकाची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. सुरेश मुनाजे (वय 48) असे हत्या करण्यात आलेल्या उद्योजकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील व्यावसायिक सुरेश मुनाजे यांचे दुबईत एक हॉटेल आहे. ते काही कामानिमित्त ठाण्यातील शहापूर तालुक्‍यातील त्यांच्या बंगल्यात काही दिवसांपासून वास्तव्यास होते.

शुक्रवारी व शनिवारी या दोन दिवसांत ते बंगल्यात एकटे असताना त्यांच्या बंगल्याची खिडकी तोडून एका अज्ञाताने चोरी करण्याच्या उद्‌देशाने आत प्रवेश केला. त्यानंतर सुरेश यांचे हातपाय बांधून त्यांना बेदम मारहाण केली.

यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)