रणवीर सिंह म्हणतो, मानधन नको!

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह याने एका पोठापाठ एक सुपरडुपर हिट चित्रपट दिल्याने त्याचा भाव चांगलाच वधारला आहे. मागील वर्षात प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंहच्या चित्रपटांनी 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. पण आता रणवीरबाबत एक धक्‍कादायक बातमी हाती लागली आहे. ती म्हणजे, आता यापुढे रणवीर सिंह चित्रपटात काम करण्यासाठी कोणतेही मानधन घेणार नाही. मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की रणवीर का फुकटात चित्रपटात काम करणार काय? पण तसे काही नाही. तर रणवीर आता चित्रपटाच्या फायद्यातील काही वाटा घेणार आहे.

रणवीर सिंह यापुढे आमिर खान, अक्षय कुमार, सलमान खान यांच्यासारखे आता चित्रपटाच्या फायद्यातील काही टक्के वाटा घेणार आहे. “पद्मावत’ या चित्रपटानंतर रणवीरने आपल्या मानधनात कमालीची वाढ केली आहे. पण आता निर्माते त्याला नफ्यातील वाटा घेण्याची गळ घालत आहे.

ही बातमी खरी ठरल्यास याची सुरुवात त्याच्या आगामी “83′ चित्रपटापासून होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीरला कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटासाठी नफ्यातील काही टक्के वाटा मिळणार आहे. निर्मात्यांसाठी हा फायद्याचा सौदा आहे. रणवीरची ज्या पद्धतीने वाटचाल सुरु आहे, त्यावरून सध्या तरी हेच स्पष्ट होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)