‘सुरवीन चावला’कडे गुड न्यूज

सुरवीन चावलाने सोशल मिडीयावर एक गुड न्यूज शेअर केली आहे. ही गुड न्यूज तिच्या कोणत्याही प्रोजेक्‍टबाबत नाही. तर तिच्या प्रेग्नन्सीबाबत आहे. सुरवीनचे लग्न कधी झाले हे देखील पब्लिकला आठवत नव्हते. या प्रेग्नन्सीच्या निमित्ताने तिने आपल्या लग्नाचीही घोषणा करून टाकली. याचा तिच्या फॅन्सला मोठाच धक्का बसला असावा.

सोशल मिडीयावरच्या पोस्टमध्ये सुरवीन म्हणाली की “आयुष्यात जे काही व्हायचे असते, ते होणारच असते. आपण कोणत्याही गोष्टीला निमंत्रण देऊ शकत नाही आणि अटकावही करू शकत नाही. सध्या एक चमत्कार मी अनुभवते आहे. ज्याला आई होण्याची प्रक्रिया म्हटले जाऊ शकते. माझ्यामध्ये एक छोटासा जीव वाढू लागला आहे.’ असे तिने म्हटले आहे.

या पोस्टमध्ये सुरवीनने आपला आणि पतीचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोच्या समोर लहान मुलाचे बूट ठेवले आहेत. सुरवीनच्या या पोस्टनंतर तिला शुभेच्छा मिळायला सुरुवात झाली आहे. पण तिचे बाळ या जगामध्ये कधी येणार आहे, हे मात्र सुरवीनने सांगितलेले नाही. सुरवीनने बिजनेसमन अक्षय ठक्करबरोबर विवाह केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)