आता नोटाबंदीवर आधारित चित्रपटाची निर्मिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीची घोषणा केली होती. मोदी यांनी 8 नाव्हेंबर 2016 रोजी सायंकाळी पाचशे आणि 1,000 रुपयांच्या नोटा रात्री 12 वाजेपासून चलनातून बाद ठरवित सर्वांना धक्‍का दिला होता. देशात घडणा-या अशा ऐतिहासिक घटनांची आणि घोषणांची बॉलिवूडमध्ये दखल घेतली जात असते. अशा घटनांमुळे चित्रपट निर्मात्यांना नवनविन विषय मिळत असतात.

नोटाबंदीनंतर अनेक चित्रपटात याचा विविध ढंगाने उल्लेख होत आहे. आता या घटनेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर भट्ट कॅम्प चित्रपट तयार करणार आहे. मुकेश भट्ट यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत सांगितले की, हो, आम्ही नोटाबंदीवर एक चित्रपट साकारणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विशेष भट्ट करणार आहे. या चित्रपटातून आम्ही कोणावरही टिका किंवा कोणत्याही प्रकारचे राजकारण दाखविणार नाही. यात फक्‍त नोटाबंदीवर आधारित ब्लॅक कॉमिडी दाखविण्यात येणार आहे.

हा चित्रपट माझा मुलगा विशेष याच्या देखरेखीत तयार करण्यात येणार आहे. अद्याप या चित्रपटाचे टायटल आणि स्टारकास्ट निश्‍चित करण्यात आलेले नाहीत, अशी माहितीही मुकेश भट्ट यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)